विश्वामित्राने वैदिकांच्या धार्मिक सृष्टीला शह देऊन एक प्रतिसृष्टी निर्माण केली होती
विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीत या मारअंकी लिपीच्या अधिष्ठानावर ब्राह्मीद्वारे मारअंकीचेच प्रथमत: पुनरुज्जीवन घडवले गेले. आपल्या ऊर्जा ब्रह्मवादाचे तत्त्वज्ञान संकलित करणारी, त्या तत्त्वज्ञानाचे रक्षण करणारी लिपी म्हणून या लिपीला ब्राह्मी संबोधन दिले गेले. ऋग्वेदातील अनेक दाखल्यावरून आणि आरण्यके, उपनिषदांवरून विश्वामित्रानेच ही ऊर्जा ब्रह्मवादी प्रतिसृष्टीची उभारणी केल्याचे स्पष्ट होते.......